chessbase india logo

हम्पी की जायनर, कोणाच्या डोक्यावर येणार विजयी मुकुट ?

by Vivek Sohani - 23/04/2025

FIDE पुणे ग्रँड प्रिक्स २०२५ च्या आठव्या फेरीत GM कोनेरु हम्पीने हरलेली बाजी वाचवत IM अलिना काश्लिन्स्काया (पोलंड) विरुद्ध बरोबरी साधली. ही बरोबरी हम्पीसाठी महत्त्वाची ठरली, कारण दुसऱ्या बाजूला GM जिनेर झू (चीन) हिने IM दिव्या देशमुखवर मात केली. त्यामुळे आता हम्पी आणि जिनेर दोघीही ८ पैकी ६ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. अंतिम फेरीनंतर दोघींचे गुण समान राहिले, तर हम्पीला अधिक चांगल्या टायब्रेक स्कोअरमुळे विजेतेपद मिळेल. GM आर. वैशाली हिने IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गेरिया) विरुद्ध रोचक हत्तीचा बळी दिला होता, पण नंतर तिची विजयाची संधी हुकली. हम्पी आणि जायनर दोघीही जर हरल्या, आणि दिव्याने अलिनावर विजय मिळवला, तर दिव्या देशमुख पोडियमवर स्थान मिळवू शकते.

हंपीने वाचवली हार, जिनरने केली दमदार पुनरागमन — अंतिम फेरीत चुरशीची शर्यत

ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिने हरलेली बाजी ड्रॉ करत आपली विजेतेपदाची आशा अखेरच्या फेरीपर्यंत जिवंत ठेवली आहे. दुसरीकडे, GM झू जायनर (चीन) हिने विजयी पुनरागमन करत अंतिम फेरीत रंगत आणली आहे. आता सर्वांचे लक्ष या दोघींच्या अखेरच्या फेरीतील लढतीकडे लागले आहे. हंपीसाठी समीकरण सोपे आहे — IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बल्गेरिया) हिच्याविरुद्ध विजय मिळवला, तर जायनरने काहीही केलं तरी हरकत नाही, हंपी सरळ सरळ विजेती ठरेल. पण जर हंपीचा डाव ड्रॉ किंवा पराभवात संपला, तर तिचं विजेतेपद जायनरच्या निकालावर अवलंबून राहील. हंपीला जायनरच्या निकालाशी तंतोतंत जुळणारं प्रदर्शन करावं लागणार आहे — आणि त्यामुळे अंतिम फेरीत शह-काटशहाची जबरदस्त झुंज पाहायला मिळणार आहे.

हम्पी की .....

जायनर ??

अलिना - हम्पी : ०५.:०.५

भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिने आंतरराष्ट्रीय मास्टर अलिना काशलिंस्काया (पोलंड, २४९६) हिच्याविरुद्ध कधीही क्लासिकल रेटेड सामन्यात पराभव स्वीकारलेला नाही. हंपीने याआधी दोन सामने जिंकले असून, एक सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात मात्र अलिनाने बराच काळ वर्चस्व राखले होते. तिने खेळाचा सूर साधला होता, पण एका चुकीच्या रूक एक्स्चेंजच्या प्रस्तावामुळे तिला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे हंपीने पुन्हा एकदा आपली थोडक्यात बचावलेली पण अपराजित कामगिरी कायम ठेवली.

डावातील ४८. ...... Re8 नंतरची स्थिती

४९. Rdd5 हा चाल योग्य असता कारण ती e5 प्यादीचे रक्षण करत होती. पण त्याऐवजी पांढऱ्याने एक मोठी चूक केली — ४९. Rb7? Rxb7 ५०. axb7 Nc5 या मालिकेनंतर काळ्याने सहज बचाव केला आणि अखेरीस सामना बरोबरीत (ड्रॉ) गेला. हंपीने संकटातून बाहेर पडत आपली अपराजित मालिका कायम ठेवली.

अलिना काश्लीनस्कायाची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

IM अ‍ॅलिना काशलिन्स्काया (पोलेण्ड) हिने GM कोनेरु हंपी विरुद्धच्या डावात विजयाची उत्तम संधी गमावली
झु जायनर हिची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

GM जिनर झू (चीन) हिने IM दिव्या देशमुख हिला पराभूत करत स्पर्धा जिंकण्याच्या तिच्या आशा कायम ठेवल्या.
मेलिया सलोम हिची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

मेलिया सलोम आणि दिव्या देशमुख यांच्यातील डाव बरोबरीत सुटला.

नुर्ग्युल - वैशाली

डावातील ३६. Bc3 नंतरची परिस्थिती

GM आर. वैशाली (2484) हिने 36...Rxf3! असा रोमांचक रूक बळी देत पांढऱ्या राजावर थेट हल्ला चढवला. यानंतर डावातील चाली अश्या स्वरुपात झाल्या: 37.gxf3 Qxf3+ 38.Kh2 Rd3 39.Qb1 Qf2+ 40.Kh1 Qf3+ 41.Kh2 Ng6 शेवटचा मोहरा देखील आघाडीवर आला. 42.Rh5 Nf4 43.Ra2 Ne2? — ही चूक IM नर्ग्युल सलीमोव्हा (बल्गेरिया, 2402) हिला सामना वाचवण्याची संधी देणारी ठरली. 44.Be5 Qf2+ 45.Kh1 Qf3+ 46.Kh2 Qf2+ 47.Kh1 Qf3+ — आणि अखेरीस सततच्या चेकमुळे सामना बरोबरीत संपला. ही लढत थरारक असूनही, वैशालीच्या एका चुकीमुळे विजय हुकला.

IM नर्ग्युल सलीमोव्हा हिने GM आर. वैष्णवीच्या विरुद्ध कठीण स्थितीत तिची लवचिकता दाखवली.

IM बटखुयाग मंगुन्तूुल (MGL) आणि IM पोलिना शुवालोव्हा यांच्यातील सामना ०.५-०.५ ने संपला.
आयएम राकेश कुलकर्णी आणि सीएम साहिल टिकू यांच्याकडून लाइव्ह कमेंट्री | व्हिडिओ: फिडे

बक्षिसे :

एकूण बक्षीस निधी €८०,००० इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €१८०००, €१३०००आणि €१०५०० आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: १३० गुण, दुसरा क्रमांक: १०५ गुण, तिसरा क्रमांक: ८५ गुण

स्पर्धेचे वेळापत्रक :

ही स्पर्धा १४ एप्रिल २०२५ पासून २३ एप्रिल २०२५ पर्यंत होणार आहे.


Contact Us