फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - सातव्या फेरीत हम्पीचा जायनर वर विजय आणि आघाडीत बरोबरी!
GM कोनेरु हम्पीने GM झू जायनर (चीन) हिला पराभूत करत FIDE पुणे ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये एकहाती आघाडी घेतली आहे. झू जायनर हिचा हा हम्पोसोबतचा क्लासिकल फॉरमॅटमधील पहिलाच पराभव असून, वजिराच्या चुकीच्या चालीमुळे तिला हार पत्करावी लागली. हम्पीने ७ पैकी ५.५ गुण मिळवत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं असून, ती इतर सर्व प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अर्धा गुणाने पुढे आहे. IM दिव्या देशमुखने IM बटखुयाग मुंगुंटुल (मंगोलिया) हिला राजाच्या बाजूकडून जोरदार हल्ला करत चकित केलं. या विजयासह दिव्या दुसऱ्या स्थानावर पोहोचली असून तिचे ५ पैकी ७ गुण आहेत. GM आर. वैशाली आणि GM हरिका द्रोणावल्ली यांनी त्यांच्या त्यांच्या अनुक्रमे IM अलिना काश्लिन्स्काया (पोलंड) आणि IM पोलीना शुवालोव्हा यांच्याशी बरोबरी साधली. आज दुपारी ३ वाजता आठव्या फेरीला सुरुवात होणार आहे.
दिव्याची दुसऱ्या स्थानी झेप
GM कोनेरु हम्पी आता FIDE पुणे ग्रँड प्रिक्स जिंकण्यापासून केवळ दोन सामने दूर आहे. सध्या तिच्याकडे ७ पैकी ५.५ गुण असून ती स्पर्धेत एकहाती आघाडीवर आहे.
शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये हम्पीचा सामना खालील खेळाडूंशी होणार आहे:
IM अलिना काश्लिन्स्काया (पोलंड)
IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बल्गेरिया)
सध्या फक्त दोन खेळाडू तिच्या पाठलागात आहेत:
IM दिव्या देशमुख (भारत)
GM जिनेर झू (चीन)
या दोघींचे ७ पैकी ५ गुण आहेत.
हम्पीने जर पुढील दोन डावांपैकी एक जिंकला आणि दुसरा बरोबरीत ठेवला, तरी ती विजेती ठरू शकते – पण स्पर्धा अजूनही तणावपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहे!
हम्पी – जिनेर : १-०
GM कोनेरु हम्पी (रेटिंग २५२८) हिचा सामना GM झू जायनर(चीन, रेटिंग २५२५) हिच्याशी झाला. याआधी दोघींमध्ये तीन वेळा क्लासिकल फॉरमॅटमध्ये सामने झाले होते – तिन्ही वेळा हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळली होती. त्या सामन्यांपैकी एक जिनेरने जिंकला होता आणि उर्वरित दोन बरोबरीत संपले होते. त्यामुळे हम्पीच्या दृष्टीने हा सामना "इक्वलायझर" देण्याची एक योग्य संधी होती – आणि तिने ती संधी जबरदस्त वापरली. जायनरने या सामन्यात क्वीन’स इंडियन डिफेन्स निवडला आणि सुरुवातीच्या चालींत सहजरीत्या स्थिती समतोल केली. मात्र नंतरच्या डावात तिने b4 पॉन घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला आणि तिथूनच तिच्या पराभवाची सुरुवात झाली. या विजयानंतर हम्पीने फिडे पुणे ग्रँड प्रिक्स २०२५ मध्ये एकहाती आघाडी घेतली आहे – ७ पैकी ५.५ गुणांसह.
जिनेर झूने b4 पॉन घेण्याचा निर्णय घेतला, जो स्पष्टपणे संशयास्पद होता. सध्याची स्थिती semi-closed स्वरूपाची आहे. जायनरकडे दोन नाइट्स असून पांढऱ्याकडे बिशपची जोडी आहे. अशा परिस्थितीत काळ्याने पोझिशन खुली करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा तोटाच होण्याची शक्यता जास्त असते.
निर्णायक घडामोडी: :
44...Qxb4?? – हाच तो संशयास्पद क्षण! काळ्याने b4 वरचा पॉन मारून स्वतःला धोक्यात टाकलं.
45.Bxe6 – पांढऱ्या खेळाडूने बिशपने e6 वरील महत्त्वाचा पॉन मारला.
46.Kg2 Qe4+ 47.Kh2 Qe2 – काळ्याने काही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच साध्य झालं नाही.
48.Bc4 Qxf2+ 49.Qg2 – पांढऱ्याने केवळ d2 वरील बिशप वाचवला नाही, तर काळ्याच्या कोणत्याही आक्रमक योजना पूर्णपणे निष्फळ केल्या.
दिव्या - मुंगुंटुल
IM दिव्या देशमुखने IM बाटखुयाग मुंगुंटुलवर राजाच्या बाजूने घातलेला आक्रमक हल्ला ही तिच्या कार्यशैलीच्या उत्कृष्ट उदाहरणांपैकी एक आहे. तिने h-पाँनने अचूक मारा करीत पुढील पोझिशन मध्ये विरोधकाला चक्रावलं. हा विजय त्यांच्या आठव्या फेरीपूर्वीच्या मॅचमध्ये (५/७) स्थान दृढ करणारा ठरला.
बक्षिसे :
एकूण बक्षीस निधी €८०,००० इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €१८०००, €१३०००आणि €१०५०० आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: १३० गुण, दुसरा क्रमांक: १०५ गुण, तिसरा क्रमांक: ८५ गुण
स्पर्धेचे वेळापत्रक :
ही स्पर्धा १४ एप्रिल २०२५ पासून २३ एप्रिल २०२५ पर्यंत होणार आहे.